बडतर्फ प्राध्यापकाच्या रिट अर्जाबाबत बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल   

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश 

पुणे : कॅम्पसमध्ये कुत्र्यांना खायला दिल्यावरून पुणे येथील फ्लेम विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकास बडतर्फ केल्याप्रकरणात प्राध्यापकाच्या दाखल रिट अर्जाबाबत ७ मे पर्यत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. 
 
कॅम्पसमध्ये कुत्र्यांना खायला देण्यावरून शिंजिनी मुखर्जी आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील प्राणी कल्याण समिती यांचा विद्यापीठ प्रशासनाशी चांगलाच वाद झाला होता. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मुखर्जी यांना पदावरून काढून टाकल्यानंतर समाजशास्त्रज्ञ मुखर्जी यांनी फेबु्रवारीमध्ये रिट अर्ज दाखल केला होता. २१ डिसेंबर रोजी विद्यापीठाने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचे पत्र दिले. १३ फेबु्रवारी २०२५ रोजी त्यांना या नोकरीवरून काढून टाकल्याच्या विरोधात अर्ज दाखल केले. 
 
मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील मिहिर देसाई यांनी युक्तीवाद केलेल्या अर्जात म्हटले की, कायमस्वरूपी कर्मचार्‍याला चौकशी शिवाय काढून टाकता येत नाही. कुत्र्यांना खायला घालण्यासारख्या प्राणी कल्याणकारी कार्यासाठी कायमस्वरूपी कर्मचार्‍याला काढून टाकता येत असले तरी उलटतपासणीसह पुरावे असले पाहिजेत आणि कोणत्याही अस्थापनेत नैसर्गिक न्यायाच्या किमान तत्वांचे उल्लंघन झाले आहे, असा युक्तीवाद त्यात करण्यात आला होता. ७ मे रोजी या अर्जाला उत्तर म्हणून विद्यापीठ प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका मांडणार आहेत.
 

Related Articles